Sunday 28 August 2016

 
जिद्द असलेला थोडासा मुक थोडासा बधिर "राज्या"
लहानपण लोकांच्या टिंगल टवाळी ऐकण्यात गेलेले. घराबाहेर पडले की लोकांच्या मस्करीचा विषय असलेला मराठवाड्याचा राज्या कदम जेव्हापासून त्याला गुड मॉर्निंग चित्रपटात भुमिका मिळाली तेव्हापासून तो खुप आनंदी असतो समाज त्याला मान सन्मान देवु लागला आहे, असे त्याचे वडील सांगतात. मी राज्या डोळ्यासमोर ठेवुन या चित्रपटाची निर्मिती केली व राज्यालाच मुख्य भुमिका दिली, याचा माझाच मला अभिमान आहे. समाजातील वंचिताला मानाचे स्थान मिळत आहे. यापेक्षा कोणताच आनंद मोठा असु शकत नाही. राज्याने केलेला अभिनय उल्लेखनीय आहे. प्रत्येक कलाकारांना त्याचा अभिनय आवडला पण पुढे प्रश्न होता डबिंगचा, राज्याला नीट बोलता येत नाही. दिग्दर्शक करण तांदळे आणी मी एक डमी शोधुन ठेवला होता. राज्याला नाही जमले तर तो डमी आवाज घ्यायचा पण दिग्दर्शक करण तांदळे यांना विश्वास आला होता. ते म्हणाले आपण राज्या कडूनच डबिंग करून घेऊ मी होकार दिला. डबिंग च्या दिवशी राज्याला पाहुन डबिंग इंजिनियर म्हणाला हा डबिंग करूच शकत नाही. पण करण तांदळे यांनी विश्वास दिला डबिंग तोच करेल असे सांगितले. जेव्हा डबिंगला सुरवात झाली त्यावेळी इंजिनियर आश्चर्य चकित झाला. हे कसे शक्य आहे या विचारातच तो डबिंग रूम मध्ये गेला व राज्या सोबत सेल्फी घेऊन बाहेर आला. अवघ्या चार तासात राज्याने त्याचे डबिंग उरकले आणी दिग्दर्शक करण तांदळे यांनी त्याला उचलुन घेतले सर्वांनी राज्याचे अभिनंदन केले....
✒लेखन: -संदिप राक्षे
(निर्माता गुड मॉर्निंग)


No comments:

Post a Comment