Sunday 28 August 2016

 
जिद्द असलेला थोडासा मुक थोडासा बधिर "राज्या"
लहानपण लोकांच्या टिंगल टवाळी ऐकण्यात गेलेले. घराबाहेर पडले की लोकांच्या मस्करीचा विषय असलेला मराठवाड्याचा राज्या कदम जेव्हापासून त्याला गुड मॉर्निंग चित्रपटात भुमिका मिळाली तेव्हापासून तो खुप आनंदी असतो समाज त्याला मान सन्मान देवु लागला आहे, असे त्याचे वडील सांगतात. मी राज्या डोळ्यासमोर ठेवुन या चित्रपटाची निर्मिती केली व राज्यालाच मुख्य भुमिका दिली, याचा माझाच मला अभिमान आहे. समाजातील वंचिताला मानाचे स्थान मिळत आहे. यापेक्षा कोणताच आनंद मोठा असु शकत नाही. राज्याने केलेला अभिनय उल्लेखनीय आहे. प्रत्येक कलाकारांना त्याचा अभिनय आवडला पण पुढे प्रश्न होता डबिंगचा, राज्याला नीट बोलता येत नाही. दिग्दर्शक करण तांदळे आणी मी एक डमी शोधुन ठेवला होता. राज्याला नाही जमले तर तो डमी आवाज घ्यायचा पण दिग्दर्शक करण तांदळे यांना विश्वास आला होता. ते म्हणाले आपण राज्या कडूनच डबिंग करून घेऊ मी होकार दिला. डबिंग च्या दिवशी राज्याला पाहुन डबिंग इंजिनियर म्हणाला हा डबिंग करूच शकत नाही. पण करण तांदळे यांनी विश्वास दिला डबिंग तोच करेल असे सांगितले. जेव्हा डबिंगला सुरवात झाली त्यावेळी इंजिनियर आश्चर्य चकित झाला. हे कसे शक्य आहे या विचारातच तो डबिंग रूम मध्ये गेला व राज्या सोबत सेल्फी घेऊन बाहेर आला. अवघ्या चार तासात राज्याने त्याचे डबिंग उरकले आणी दिग्दर्शक करण तांदळे यांनी त्याला उचलुन घेतले सर्वांनी राज्याचे अभिनंदन केले....
✒लेखन: -संदिप राक्षे
(निर्माता गुड मॉर्निंग)


"सैराट" चित्रपटातील प्रमुख भुमिका असणारे व आमच्यावर बंधुवत प्रेम करणारे प्रसिद्ध अभिनेते सुरेशजी विश्वकर्मा यांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभले. सन्मान करताना सर्व गुड मॉर्निंग टीम.....


दिग्दर्शन क्षेत्रातील उगवता तारा :- करण तांदळे
गुड मॉर्निंग या चित्रपटाचे युवा दिग्दर्शक करण तांदळे. वयाच्या 24 व्या वर्षी दिग्दर्शन क्षेत्रात यशस्वी होणे अवघड आहे. दिग्दर्शना बरोबर कॅमेरामन हे काम सुद्धा मोठ्या मनाने स्वीकारतात इतक्या लहान वयात हे सुद्धा ज्ञान असणे हि ईश्वरीय देणगी म्हणावी लागेल. .ftii cinematographer हि पदवी घेतल्या नंतर त्यांनी दिग्दर्शक म्हणून कामाचा प्रारंभ केला. मी स्वतंत्र होणारच या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक, फ्रेन्ड्स शीप बी अलर्ट या चित्रपटाचे दिग्दर्शक व कॅमेरामन, सल या मराठी चित्रपटाचे कॅमेरामन, निलवंती या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक व कॅमेरामन, खरतर या क्षेत्रात कमी ज्ञान असणारी मंडळीच आम्ही खुप काही आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करित असतात, परंतु सेट वर असल्यावर फक्त काम एके काम दुसरे काहीच डोक्यात नसते. शॉर्ट घेताना असे अँगल घेतात की मुरब्बी कॅमेरामन किंवा दिग्दर्शकाला जमणार नाही. गुड मॉर्निंग हे नाव चित्रपटाला देण्याची कल्पना करण यांचीच मी त्यांना विचारले असे नाव त्यांनी खुप सुंदर उत्तर दिले तुम्ही प्रथमच निर्मिती क्षेत्रात उतरत आहात. म्हणजे तुमचा उदय, राज्या प्रथमच चित्रपटात काम करतो त्याचा हि उदय म्हणून हे नाव. हसत हसत उत्तर दिले यापुढे जाऊन ते म्हणाले हल्ली नविन पिढीला आकर्षित करण्यासाठी नाव सुद्धा तसेच असणे गरजेचे आहे. चित्रपटाची कथा छान झाली त्या साठी कलाकार सुद्धा त्यांनी पसंत केले मी त्यांच्या कामात अजिबात दखल दिली नाही. त्यामुळे त्यांनी अतिशय मनलावुन चित्रपटाचे दिग्दर्शन केले. प्रत्येक दिवसाचे शेड्युल ते अगोदरच्या दिवशी लावत होते तशी कल्पना ते सर्वांना देत असत, त्यामुळे प्रत्येक सहकारी वेळेवर हजर होत होता. वेळ कामाचा उरक आणी त्यांची सहका-यांवर असणारी मजबुत पकड या मुळे वेळे अगोदरच शुटिंग पुर्ण झाले याचे श्रेय फक्त करण यांनाच. रोज दिवसभर कॅमेरा आणि दिग्दर्शन यात व्यस्त पण झोपण्याच्या वेळी मात्र उद्याच्या शुट च्या फ्रेम डोळ्यासमोर असायच्या, मी विचार करायचो दिवसभर इतके थकून सुद्धा आरामाच्या वेळी चित्रपटा विषयी विचार झोप नाही भुक नाही अंगी बडेजाव पणा नाही. चित्रीकरण संपले की प्रत्येक जण पहिले जेवण व झोपण्याची तयारी करत असत पण "करण" कधीच सर्व सहका-यांच्या अगोदर जेवले नाही. मी जिथे जेवणाची सोय केली तिथेच सर्व आर्टस विभाग झोपायचा "करण" सुद्धा त्याच मंडपात झोपायचे मी म्हणायचो तुमच्या वर सर्व जबाबदारी आहे तुमचा आराम होणे गरजेचे आहे. तुम्ही एखाद्या फार्म हाऊस वर आराम करीत जा ते म्हणाले माझे सहकारी जेथे मी सुद्धा तेथेच याला म्हणतात दिग्दर्शक इतक्या लहान वयात इतके मोठे विचार कधी कधी मलाच विचार करायला लावायचे. सेट वर असताना त्यांना चित्र विचित्र चर्चा मस्करी खपत नसे,असे कोणी आढळले की इथुन बाहेर जा सरळ सांगायचे मग तो कोणीही असो. या चित्रपटात दिग्गज कलाकार आहेत प्रत्येकाने करण यांच्या दिग्दर्शनाची प्रशंसाच केली, असा दिग्दर्शक पहिल्यांदा पाहिला ते आवर्जून सांगायचे खरच खुप मजा आली चित्रपट करताना हि कमेंट प्रत्येक कलाकाराची असायची हे श्रेय फक्त करण तांदळे यांनाच, अभिनेते ओंकार कर्वे यांना पहिल्यांदा खुप मोठा प्रश्न पडला होता करण यांना पाहुन, हे काय दिग्दर्शकन करणार पण शुटिंग च्या दरम्यान स्व:ता अनुभव घेतल्यावर ते करण यांच्या दिग्दर्शनाच्या प्रेमात पडले. ते जाताना बोलले प्रत्येक दिग्दर्शकाला कधी कधी आम्हाला समजावून सांगावे लागत होते असा अँगल घे हि भुमिका अशी झाली पाहिजे, पण करण यांना काहीच सांगावे लागले नाही खरच ग्रेट दिग्दर्शक आहे. गुड मॉर्निंग हा मराठी चित्रपट या युवा दिग्दर्शकाच्या कल्पना शक्तीतुन साकारला आहे, तो यशस्वी होणारच परंतु करण तांदळे हे नाव सुद्धा एक दिवस भारताच्या दिग्गज दिग्दर्शकांमध्ये गणले जाणार हि काळ्या दगडावरची रेघ.
लेखन :- संदिप राक्षे


 
मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेली सदाबहार अभिनेत्री राधा कुलकर्णी (सागर)
"गुड मॉर्निंग" या मराठी चित्रपटा मध्ये प्रमुख भुमिका असलेली गुणी अभिनेत्री "राधा कुलकर्णी" यांनी मराठी रंगभूमीवरून आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरवात केली. घाशीराम कोतवाल, आई रिटायर होतेय, आती रहेंगी बहारे अशा दर्जेदार नाटका मधुन आपली अप्रतिम भुमिका साकार केली आहे. नाती खेळ,या चित्रपटात प्रमुख भुमिका, एक अलबेला, वजनदार, कालचक्र, या मराठी चित्रपटात काम करीत असताना प्रत्येक अभिनय दर्जेदार करून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. झी मराठीवर कन्यादान हि मालिका खुप गाजली त्या मध्ये किट्टू हे कॅरेक्टर साकारले त्यामुळे राधा कुलकर्णी हे नाव घराघरात पोहोचले आहे. स्टार प्रवाहावरील जयस्तुते, कलर्स मराठीवर एक मोहोर अबोल, स्टार प्रवाह वरील लक्ष्य, झी मराठीवरील अस्मिता या कार्यक्रमामधुन अभिनयाची गगन भरारी घेणाऱ्या अभिनेत्री राधा कुलकर्णी यांनी गुड मॉर्निंग या मराठी चित्रपटात सुद्धा अविस्मरणीय भुमिका पार पाडली. पहिल्याच दिवशी राधाजींची ओळख झाली. कुठलाच मोठेपणा त्यांच्या चेहऱ्यावर जाणवला नाही. आपल्या अभिनयाशी एकरूप होऊन तो अभिनय सहजपणे त्या साकारीत होत्या. त्यांच्या सोबत राज्या हा नविन त्यात तो मुक बधिर पण राधाजी त्याला प्रेमाने प्रत्येक गोष्ट समजावीत होत्या, त्यामुळे राजाला त्यांचा खुप आधार वाटत असे. राज्याला कोणी बोलले तरी त्या बोलणा-यावर रागावत असत. एक दिवस घरच्या आठवणी मुळे राज्या उदास होता रडत होता राधाजींनी त्याला जवळ घेतले समजावले त्याच्या बरोबर त्या सुद्धा भावनिक झाल्या होत्या त्यांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले होते. सह कलाकाराला समजुन घेण्यात किती मोठेपणा त्यांच्या अंगी होता ते जाणवले. शुटिंग च्या दरम्यान उन्हाळा असल्याने प्रचंड गरम होत होते पण राधाजींनी कसलीच तक्रार केली नाही. प्रत्येक सीनस दिग्दर्शक करण तांदळे यांना विचारत असत तुला आवडला का नसेल आवडला तर आपण पुन्हा रीटेक घेऊयात इतका समजदार पणा इतक्या मोठ्या कलाकारांन मध्ये क्वचित पहायला मिळतो. शूटिंगच्या दरम्यान त्यांची भूमिका संपली तरी त्या आवर्जून सेट वर थांबत असत प्रत्येकाला अभिनयासाठी प्रोत्साहन देत असत. राधाजींनी कधीच कोणत्या गोष्टीसाठी हट्ट केला नाही. आहे त्या वातावरणाशी जुळवून घेतले. एक दिवशी रात्री पळण्याचा शाॅर्ट होता. तो खुप वेळा घेतला गेला पळुन पळून इतर सर्व जण थकून गेले पण राधाजी अजिबात थकल्या नाहीत खरच सदाबहार असे व्यक्तीमत्व आमच्या या चित्रपटाला लाभले हे आमचे भाग्य समजतो. त्यांची दर्जेदार भुमिका नक्कीच रसिकांना आवडेल यात शंकाच नाही
लेखन :- संदिप राक्षे


 
"गुड मॉर्निंग" या चित्रपटाची निर्मिती करताना ज्या मतीमंद व मुक बधिर मुलाला डोळ्या समोर ठेवुन या चित्रपटाची निर्मिती केली तो "राज्या कदम" हा धोंडराई ता गेवराई जिल्हा बीड येथील लहानपणा पासुन थोडा मुक बधिर थोडा मतीमंद असा पण गावात लोकप्रिय असलेला राज्या. घरातील व्यक्तीनी सुद्धा त्याला खुप जीव लावुन सांभाळलेला. आज प्रत्येक क्षेत्रात पाहिले तर आपल्या मुलांच्या साठी धडपडणारे पालक खुप आहेत पण मी आयुष्यात कधीच असा विचार केला नाही आपली आणी बाहेरची मुल हा विषय कधीच मनाला शिवला नाही. त्यामुळेच या चित्रपटाची निर्मिती सहज माझ्या कडून झाली.. एखादा चित्रपट तयार होतो त्या वेळी जे भुमिका करणारे कलाकार हे प्रशिक्षित असतात. पण मी या चित्रपटासाठी ओरिजिनल कलाकार म्हणून राज्याची निवड केली तो कुठल्याच बाजुने ड्युप्लीकेट वाटला नाही. ज्यावेळी मी निर्णय घेतला चित्रपट करण्याचा मनात धाक धुक होती राज्या काम करेल का अर्धवट सोडून गेला तर या विचाराने मन सुन्न होते पण सामाजिक विचार शांत बसुन देत नव्हता. आपण चुकीचे करीत नाही ही खात्री होती. अन जर एखाद्या मुलाचे जर भाग्य उजाडत असेल तर काय हरकत आहे रिस्क घ्यायला. दिग्दर्शक करण तांदळे यांना या सर्व गोष्टी सांगितल्या त्यांनी शब्द दिला आपण नक्कीच याच्या कडून चांगली भुमिका करून घेऊ. कथा लेखक किशोर गि-हे यांनी सुद्धा पहिली या राज्याची टेस्ट घेतली आणी सांगितले तो नक्कीच चांगली भुमिका करेल. सर्व तयारी झाली शुटिंग चा दिवस ठरला आणी पहिल्यांदा राज्या कॅमेरा समोर उभा राहिला पहिलाच शॉर्ट होता शाळेतील शिक्षक राज्याला मारत आहेत आणी मुल चिडवत आहेत. शिक्षक कलाकार फक्त अॅक्टिंग करत होते मारण्याची पण राज्या खूप घाबरला आणि रडायला लागला त्याच्या पप्पांन कडे घरी जायचे म्हणून हट्ट करू लागला. माझे हातपाय थरथरू लागले पुढे काय मी त्याच्या जवळ गेलो आणी तो गळ्यात पडून रडू लागला. हळू हळु रडायचा कमी झाला त्याला समजावून सांगितले हा चित्रपट तुझ्या साठी तयार करतो ना मग तु का असे करतोस. त्याचे पप्पा पोपटराव कदम दिग्दर्शक करण तांदळे यांनी समजावले त्या नंतर थोडा नाॅर्मल झाला त्या नंतर राज्याने सर्व वनटेक मध्ये भुमिका पार पाडल्या सर्वांना या गोष्टीचे आश्चर्य वाटत होते. इतक्या अवघड भुमिका तो सहज करीत होता. .. खरच हि सर्व कृपा आळंदीच्या त्या माऊलींची होती. अडचणी खुप येत होत्या सामाजिक भान सोडून जो तो फक्त पैशाचा विचार करीत होता. या गोष्टीचे थोडे वाईट वाटत होते. पण प्रत्येक क्षण शिकवित होता पैशाशिवाय काहीच नाही. इथुन पुढे चित्रपटाची प्रसिद्धी होण्यासाठी खुप पैसे लागणार आहेत पण चांगल्या कार्याला साथ देणारी माणसे सुद्धा या समाजात आहेत त्यामुळे पुढची चिंता नाही. एक सामाजिक विषय या चित्रपटाच्या कथेत आहे त्यामुळे नक्कीच हा चित्रपट सर्वांच्या पसंतीला उतरणार हे सत्य आहे. ..
लेखन :- संदिप राक्षे


Upcoming Marathi feature film,
Sahyadri arts..,
"GOOD MORNING"
Producer: Sandeep Rakshe
Director & Dop: Karan Tandale

मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेला मातब्बर कलाकार :- सुरेश विश्वकर्मा
माणसांच्या अंगात कला हि ठासुन भरलेली असते,कलेचा आदर तिचा मोठे पणा मिरवायचा नाही, कुठलाही प्रसंग असला कसेही वातावरण असले तरी त्यात लवकर एकरूप होणार व्यक्तीमत्व म्हणजे सुरेश विश्वकर्मा. पडद्यावर पहाणे व साक्षात पहाणे खुप मोठा फरक असतो त्यामुळे मी पहिल्यांदा ओळखले नाही. गुड मॉर्निंग च्या सेटवर करण तांदळे यांनी माझी ओळख त्यांच्याशी करून दिली. मनमिळावू स्वभावाचे सुरेश विश्वकर्मा जणु काही आमची पहिल्या पासुन मैत्री आहे असे माझ्याशी वागू लागले. माणूस कलेने किती ही मोठा असला तरी माणुसकीने मोठा पाहिजे तेच गुण सुरेश विश्वकर्मा यांच्यात दिसले. अनेक मराठी चित्रपटात मुख्य भुमिका साकारत त्यांनी आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. गुड मॉर्निंग चित्रपटातील त्यांची भुमिका अविस्मरणीय आहे प्रत्येक सीन मध्ये ते एकरूप होऊन जात असत. भुमिका छोटी असो वा मोठी काम करीत रहायचे हे त्यांचे शब्द मनाला भावुन गेले. शुटिंग साठी एस टी न मिळाल्या मुळे एक सीन झाला नाही त्यामुळे सुरेश सर निवांत होते त्यांनी मला सांगितले आज चुलीवरची भाकर आणी पावटयाची आमटी शेतात झाडाखाली बसुन खायची इच्छा आहे. मी लगेच मामाच्या घरी भाकरी आणी आमटी बनवायला सांगितली, दोघेही शेतातल्या झाडा खाली गेलो तो पर्यंत आमचे जेवण आले होते. झाडा खालचा गारवा आणी वातावरण जेवणाची चव वाढवित होते, गप्पा मारता मारता पोटभर जेवण केले. संपूर्ण जीवन चरित्र त्यांनी मला सांगितले इतके मोठे दिग्गज कलाकार असून सुद्धा साधी राहणी, माणुसकीचा झराच त्यांच्या स्वभावातून जाणवत होता. बोलता बोलता ते म्हणाले आपल्या चित्रपटाचा विषय सामाजिक आहे. त्या मधील राज्या हा छोटा कलाकार ओरिजिनल मुक बधिर तुम्ही या चित्रपटात घेतलात, त्यामुळे या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार नक्कीच मिळणार. मी त्यांचे आभार मानले इतक्या मोठय़ा कलाकाराकडून चित्रपटा विषयी असे शब्द मुखातून येणे म्हणजे यशाची पायरी सुरू झाली. आज सुरेश विश्वकर्मा यांची प्रमुख भुमिका असलेला सैराट हा चित्रपट प्रदर्शित होत आहे त्यांना या चित्रपटासाठी गुड मॉर्निंग टीम कडून खूप खूप शुभेच्छा!
लेखन:- संदिप राक्षे