Sunday 28 August 2016

मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेला मातब्बर कलाकार :- सुरेश विश्वकर्मा
माणसांच्या अंगात कला हि ठासुन भरलेली असते,कलेचा आदर तिचा मोठे पणा मिरवायचा नाही, कुठलाही प्रसंग असला कसेही वातावरण असले तरी त्यात लवकर एकरूप होणार व्यक्तीमत्व म्हणजे सुरेश विश्वकर्मा. पडद्यावर पहाणे व साक्षात पहाणे खुप मोठा फरक असतो त्यामुळे मी पहिल्यांदा ओळखले नाही. गुड मॉर्निंग च्या सेटवर करण तांदळे यांनी माझी ओळख त्यांच्याशी करून दिली. मनमिळावू स्वभावाचे सुरेश विश्वकर्मा जणु काही आमची पहिल्या पासुन मैत्री आहे असे माझ्याशी वागू लागले. माणूस कलेने किती ही मोठा असला तरी माणुसकीने मोठा पाहिजे तेच गुण सुरेश विश्वकर्मा यांच्यात दिसले. अनेक मराठी चित्रपटात मुख्य भुमिका साकारत त्यांनी आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. गुड मॉर्निंग चित्रपटातील त्यांची भुमिका अविस्मरणीय आहे प्रत्येक सीन मध्ये ते एकरूप होऊन जात असत. भुमिका छोटी असो वा मोठी काम करीत रहायचे हे त्यांचे शब्द मनाला भावुन गेले. शुटिंग साठी एस टी न मिळाल्या मुळे एक सीन झाला नाही त्यामुळे सुरेश सर निवांत होते त्यांनी मला सांगितले आज चुलीवरची भाकर आणी पावटयाची आमटी शेतात झाडाखाली बसुन खायची इच्छा आहे. मी लगेच मामाच्या घरी भाकरी आणी आमटी बनवायला सांगितली, दोघेही शेतातल्या झाडा खाली गेलो तो पर्यंत आमचे जेवण आले होते. झाडा खालचा गारवा आणी वातावरण जेवणाची चव वाढवित होते, गप्पा मारता मारता पोटभर जेवण केले. संपूर्ण जीवन चरित्र त्यांनी मला सांगितले इतके मोठे दिग्गज कलाकार असून सुद्धा साधी राहणी, माणुसकीचा झराच त्यांच्या स्वभावातून जाणवत होता. बोलता बोलता ते म्हणाले आपल्या चित्रपटाचा विषय सामाजिक आहे. त्या मधील राज्या हा छोटा कलाकार ओरिजिनल मुक बधिर तुम्ही या चित्रपटात घेतलात, त्यामुळे या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार नक्कीच मिळणार. मी त्यांचे आभार मानले इतक्या मोठय़ा कलाकाराकडून चित्रपटा विषयी असे शब्द मुखातून येणे म्हणजे यशाची पायरी सुरू झाली. आज सुरेश विश्वकर्मा यांची प्रमुख भुमिका असलेला सैराट हा चित्रपट प्रदर्शित होत आहे त्यांना या चित्रपटासाठी गुड मॉर्निंग टीम कडून खूप खूप शुभेच्छा!
लेखन:- संदिप राक्षे

No comments:

Post a Comment