Sunday 28 August 2016

 
"गुड मॉर्निंग" या चित्रपटाची निर्मिती करताना ज्या मतीमंद व मुक बधिर मुलाला डोळ्या समोर ठेवुन या चित्रपटाची निर्मिती केली तो "राज्या कदम" हा धोंडराई ता गेवराई जिल्हा बीड येथील लहानपणा पासुन थोडा मुक बधिर थोडा मतीमंद असा पण गावात लोकप्रिय असलेला राज्या. घरातील व्यक्तीनी सुद्धा त्याला खुप जीव लावुन सांभाळलेला. आज प्रत्येक क्षेत्रात पाहिले तर आपल्या मुलांच्या साठी धडपडणारे पालक खुप आहेत पण मी आयुष्यात कधीच असा विचार केला नाही आपली आणी बाहेरची मुल हा विषय कधीच मनाला शिवला नाही. त्यामुळेच या चित्रपटाची निर्मिती सहज माझ्या कडून झाली.. एखादा चित्रपट तयार होतो त्या वेळी जे भुमिका करणारे कलाकार हे प्रशिक्षित असतात. पण मी या चित्रपटासाठी ओरिजिनल कलाकार म्हणून राज्याची निवड केली तो कुठल्याच बाजुने ड्युप्लीकेट वाटला नाही. ज्यावेळी मी निर्णय घेतला चित्रपट करण्याचा मनात धाक धुक होती राज्या काम करेल का अर्धवट सोडून गेला तर या विचाराने मन सुन्न होते पण सामाजिक विचार शांत बसुन देत नव्हता. आपण चुकीचे करीत नाही ही खात्री होती. अन जर एखाद्या मुलाचे जर भाग्य उजाडत असेल तर काय हरकत आहे रिस्क घ्यायला. दिग्दर्शक करण तांदळे यांना या सर्व गोष्टी सांगितल्या त्यांनी शब्द दिला आपण नक्कीच याच्या कडून चांगली भुमिका करून घेऊ. कथा लेखक किशोर गि-हे यांनी सुद्धा पहिली या राज्याची टेस्ट घेतली आणी सांगितले तो नक्कीच चांगली भुमिका करेल. सर्व तयारी झाली शुटिंग चा दिवस ठरला आणी पहिल्यांदा राज्या कॅमेरा समोर उभा राहिला पहिलाच शॉर्ट होता शाळेतील शिक्षक राज्याला मारत आहेत आणी मुल चिडवत आहेत. शिक्षक कलाकार फक्त अॅक्टिंग करत होते मारण्याची पण राज्या खूप घाबरला आणि रडायला लागला त्याच्या पप्पांन कडे घरी जायचे म्हणून हट्ट करू लागला. माझे हातपाय थरथरू लागले पुढे काय मी त्याच्या जवळ गेलो आणी तो गळ्यात पडून रडू लागला. हळू हळु रडायचा कमी झाला त्याला समजावून सांगितले हा चित्रपट तुझ्या साठी तयार करतो ना मग तु का असे करतोस. त्याचे पप्पा पोपटराव कदम दिग्दर्शक करण तांदळे यांनी समजावले त्या नंतर थोडा नाॅर्मल झाला त्या नंतर राज्याने सर्व वनटेक मध्ये भुमिका पार पाडल्या सर्वांना या गोष्टीचे आश्चर्य वाटत होते. इतक्या अवघड भुमिका तो सहज करीत होता. .. खरच हि सर्व कृपा आळंदीच्या त्या माऊलींची होती. अडचणी खुप येत होत्या सामाजिक भान सोडून जो तो फक्त पैशाचा विचार करीत होता. या गोष्टीचे थोडे वाईट वाटत होते. पण प्रत्येक क्षण शिकवित होता पैशाशिवाय काहीच नाही. इथुन पुढे चित्रपटाची प्रसिद्धी होण्यासाठी खुप पैसे लागणार आहेत पण चांगल्या कार्याला साथ देणारी माणसे सुद्धा या समाजात आहेत त्यामुळे पुढची चिंता नाही. एक सामाजिक विषय या चित्रपटाच्या कथेत आहे त्यामुळे नक्कीच हा चित्रपट सर्वांच्या पसंतीला उतरणार हे सत्य आहे. ..
लेखन :- संदिप राक्षे


No comments:

Post a Comment